Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी ढगाळ वातावरण, तर कोकणात गुलाबी थंडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. राज्यामध्ये पहाटेच्या वेळी 15 ते 19 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. बुधवारी मुंबईसह उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

आज (25 जानेवारी) राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, सातारा या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तसेच या भागांमध्ये मेघर्जीनेसह पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतामध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर राज्यातील थंडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून उन्हाचा चटका कायम आहे. राज्यातील अनेक भागात कमाल तापमानाचा पारा 29 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीमध्ये 32.96 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

उत्तर भारतामध्ये देखील थंडीचा जोर कमी झाला आहे. अशात उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या