Weather Update | राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, तर ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीची लाट तर कुठे पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. राज्यात किमान तापमानात चढ-उतार बघायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतीतील गहू, हरभरा, मका या पिकांना वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होणार आहे.

दरम्यान, उत्तर भारतामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढलं आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा या भागांमध्ये गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या