InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

१० GB रॅम असलेला वीवो NEX Dual डिस्प्ले एडिशन लॉन्च……

- Advertisement -

विवो ने आपला नवीन Vivo Nex Dual Display एडिशन लॉन्च केला आहे. डिवाइसच्या नावात डुअल डिस्प्ले टाकण्याचे कारण म्हणजे हा स्मार्टफोन डुअल डिस्प्ले सह येतो. डिवाइसच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही वर डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसचा एक अजून वेगळा फीचर म्हणजे हा 3D TOF स्टीरियो कॅमेऱ्यासह येतो.

विवो NEX Dual Display Edition पहिल्या जनरेशनच्या Vivo NEX पेक्षा खूप वेगळा आहे. यावेळी डिवाइस मध्ये पॉप-अप कॅमेरा देण्यात आलेला नाही. कदाचित कंपनी एका नवीन डिजाइन स्टाइल कडे इशारा करत आहे किंवा २०१९ च्या पहिल्या सहामाहीत डिवाइसचा अजून एक अन्य मॉडेल पॉप-अप कॅमेरा डिजाइन सह लॉन्च होणार असल्याची शक्यता आहे.

Loading...

स्पेसिफिकेशंस पाहता Vivo NEX Dual Display एडिशन 6.39 इंचाच्या सुपर AMOLED बेजल-लेस डिस्प्ले सह येतो ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आणि रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. विवो चे म्हणणे आहे कि डिस्प्लेचा स्क्रीन रेश्यो 91.63% आहे. रियर डिस्प्ले पण क्वालिटीच्या बाबतीती सुपर AMOLED डिस्प्ले सारखाच आहे. रियर डिस्प्लेची साइज 5.49 इंच आहे आणि जो 1920×1080 पिक्सल FHD रेजोल्यूशन ऑफर करतो तसेच याचा आस्पेक्ट रेश्यो 16:9 आहे. Vivo NEX Dual स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट, 10GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -

Loading...

विशेष म्हणजे विवो ने NEX Dual डिवाइस मध्ये फ्रंट-फेसिंग कॅमेरा सामील केला नाही. तसेच डिवाइसच्या बॅकला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एक 12MP कॅमेरा आहे जो OIS आणि f/1.79 अपर्चर लेंस सह येतो, दुसरा 2MP चा सेंसर आहे जो f/1.8 अपर्चर सह सादर केला गेला आहे हा एक डेप्थ सेंसर आहे. तिसरा कॅमेरा 3D TOF (टाइम ऑफ फ्लाइट) आहे जो काही एडवांस फीचर्स ऑफर करतो जसे की, ब्यूटीफिकेशन, युजरच्या चेहऱ्याची 3D मॉडलिंग इत्यादी. सेंसर्स च्या डावीकडे एक फ्लॅश देण्यात आला आहे. फेस अनलॉक व्यतिरिक्त डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. Vivo NEX Dual Display Edition मॉडिफाइड एंड्राइड 9.0 पाई सह फनटच OS 4.5 वर चालतो. हा विवोच्या JOVI वॉयस असिस्टेंट सह येतो. डिवाइस मध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जो 10V/2.25A फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

महत्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.