Weight Lose Tips | वजन कमी करण्यासाठी करा वॉटर फास्टिंग, कसे? जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight) ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम पासून डायटिंग पर्यंत सर्व पर्याय अवलंबतात. पण वजन कमी करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, योग, दृढनिश्चय इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी उपवास करण्याची पद्धत अवलंबतता. त्याचबरोबर काही लोक वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग (Water Fasting) करतात. वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग हा लोकप्रिय उपाय होत चालला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण वजन कमी करायचे असेल, आणि तुम्ही वॉटर फास्टिंग करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वॉटर फास्टिंग कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

आरोग्य तज्ञांच्या मते, वॉटर फास्टिंग फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. वॉटर फास्टिंग केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ते शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत करते. वॉटर फास्टिंग करणे खूप सोपे असून तुम्ही ते आठवड्यातून दोन-तीन दिवस करू शकतात.

वजन (Weight) कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग कसे मदत करते?

तज्ञांच्या मते, शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोकांना वजन कमी करायचे असते. दरम्यान, वॉटर फास्टिंग करताना शरीराला ऊर्जेसाठी कोणतेही प्रकारच्या कार्बोहायड्रेटवर अवलंबून राहावे लागत नाही. वॉटर फास्टिंग सुरू असताना शरीरात साठलेल्या चरबीचा उर्जेसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे वॉटर फास्टिंग केल्याने वजन कमी होऊ शकते.

वॉटर फास्टिंग कसे सुरु करावे?

वॉटर फास्टिंग सुरू करण्याआधी तुम्ही एक दोन दिवस अगोदर तुमच्या आहाराचे प्रमाण कमी करून शरीराला तयार करू शकता. यामध्ये तुम्ही दिवसातून एकदाच खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर वॉटर फास्टिंग करणार असाल तर तुम्हाला 24 तास फक्त पाणीच प्यावे लागते.

वॉटर फास्टिंग करताना हे लक्षात ठेवा

  • अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनी वॉटर फास्टिंग करू नये. त्याचबरोबर साठ ते सत्तर वर्षावरील लोकांनीही वॉटर फास्टिंगकरण्याचा विचार करू नये.
  • गरोदर स्त्रियांनी देखील वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वॉटर फास्टिंग चा उपयोग करू नये.
  • जे लोक डायबिटीस, कॅन्सर आणि इतर कोणत्याही आजाराने ग्रासलेले आहेत त्यांनी देखील वॉटर फास्टिंग करणे टाळावे.
  • जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर तुम्ही वॉटर फास्टिंग करू नये.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.