Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आवळ्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, आयरन, अँटीऑक्सीडेंट इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. आवळ्यामध्ये आढळणारे विटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर आवळ्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. आवळ्यामध्ये आढळणारे गुणधर्म पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. आवळ्याचे खालील पद्धतीने सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.

आवळा पावडर (Amla powder For Weight Loss)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर आवळा पावडर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला एक चमचा आवळा पावडर कोमट पाण्यामध्ये मिसळून सेवन करावे लागेल. दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये आवळा पावडर मिसळून सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. याचे नियमित सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

आवळा रस (Amla juice For Weight Loss)

आवळ्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकतात.

आवळा आणि कोरफडीचा रस (Amla and Aloe juice For Weight Loss)

आवळा आणि कोरफडीच्या रसाचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा रस आणि दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. त्याचबरोबर याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने आवळ्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Pineapple Benefits)

उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अननसामध्ये आढळणारे फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. अननसाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि लठ्ठपणापासून देखील आराम मिळू शकतो.

वजन कमी होते (Weight loss-Pineapple Benefits)

या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर अननसाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अननसाचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होऊ शकतो. अननस खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि मेटाबॉलिझम वाढते, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या