Weight Loss Tips | दिवाळीमध्ये जर वजन वाढू द्यायचे नसेल तर ‘या’ गोष्टी करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळीमुळे Diwali आपल्याला सगळीकडे मिठाई आणि फराळ बनताना दिसत आहे. त्याचबरोबर दिवाळी दरम्यान गिफ्ट गेल्यावर किंवा कोणाच्या घरी गेल्यावर मिठाई दिली जाते. त्यामुळे दिवाळीमध्ये आपले गोड खाण्याचे प्रमाण थोडे वाढत जाते आणि परिणामी आपल्या वजन Weight झपाट्याने वाढत जाते. पण तुम्हाला जर वाटत असेल की दिवाळीमध्ये तुमचे वजन वाढू नये तर त्यासाठी तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. या टिप्स फॉलो केल्यावर तुम्ही मिठाई सुद्धा खाऊ शकता आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते. मिठाई खाऊन देखील वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.

दररोज सकाळी मेथीच्या पाण्याचे सेवन करा

दिवाळीमध्येच नाही तर कधीही तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी मेथीचे पाण्याचे सेवन करणे तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. मेथीच्या पाण्याचे सेवन करणे विशेषतः डायबिटीसच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. मेथीचे पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्याचबरोबर मेथीचे पाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहते.

गोड किंवा तेलगट पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी प्या

दिवाळीच्या दिवसात विशेषता गोड आणि तेलगट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. फराळाशिवाय आणि गोड पदार्थांशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे गोड आणि फराळ खाल्ल्यावर तुम्ही जर गरम पाण्याचे सेवन केले तर तुमचे वजन वाढणार नाही. हे पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी पिल्यास अन्न पचायला सोपे जाऊन अतिरिक्त चरबी जळते.

दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी प्या

ग्रीन टी पिल्याने लठ्ठपणा कमी होऊन पचन क्रिया चांगली होते. त्यामुळे या सदासुदींच्या दिवसांमध्ये वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी चे सेवन करा. ग्रीन टी पिल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहून तुम्ही निरोगी राहाल.

व्यायाम करणे टाळू नका

दिवाळी दरम्यान सुट्ट्या आपल्यामुळे आपण थोडेसे आळशी होऊन खाण्यापिण्याकडे जास्त भर देत असतो. पण जर तुम्हाला गोड आणि तेलकट खाऊन वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला व्यायाम आणि चालणे सोडून चालणार नाही. कारण जितका तुम्ही व्यायाम कराल तितक्या तुमच्या कॅलरीज बर्न होतील.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.