Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वजन Weight वाढणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम पासून डायटिंग पर्यंत सर्व पर्याय अवलंबतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की या मागचे सर्वात मोठे कारण तुमचा आहार असू शकतो. योग्य प्रमाणात आहार न घेतल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही आहाराबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहून तुमचे शरीर निरोगी राहील.

सफरचंद

फळांचा राजा आंबा असला तरी आरोग्याचा राजा म्हणून सफरचंद याची ख्याती आहे. त्यामुळे डॉक्टर हे आपल्याला नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दररोज एक सफरचंद आपल्याला डॉक्टरांपासून दूर ठेवू शकतो अशी म्हण देखील आपण नेहमी ऐकत असतो. कारण सफरचंदामध्ये शरीराला आवश्यक ते जीवनसत्व आणि पोषक घटके मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असून एका सफरचंदामधून तुम्हाला 100 कॅलरीज मिळू शकतात.

ब्रोकोली

ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात सल्फोरोफेन उपलब्ध असते. त्याचबरोबर ब्रोकोली मध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे शरीरावर जमा झालेली चरबी कामी करण्यास ब्रोकोली मदत करते. ब्रोकोली मध्ये आढळणारे फायटोकेमिकल कंपाऊंड प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, स्किन इत्यादी गोष्टींपासून तुम्हाला आजारांपासून दूर ठेवते.

अंडी

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असे आपण नेहमी ऐकत असतो. कारण अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स उपलब्ध असतात. त्यामुळे दररोज एक ते दोन अंडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी होऊन आपले शरीर निरोगी राहू शकते. त्याचबरोबर अंडी खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन बी, प्रोटीन, विटामिन डी, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे अंडी आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करून आपले शरीर निरोगी ठेवतात.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.