सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन, हृदयविकाराच्या धक्क्याने अखेरचा श्वास

नवी दिल्ली : कलाक्षेत्रातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज (८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

पंडित बिरजू महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. कथ्थक नर्तनासोबतच ते शास्त्रीय गायकही होते.

बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेसुद्धा प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. ​​​​​​तसेच बिरजू महाराज यांच्या मनात महाराष्ट्र आणि बंगालसाठी विशेष स्थान होते. ‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असे त्यांनी म्हटले होते.

 

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा