InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आम्हीही सज्ज आहोत पुलवामा नंतर शोएब अख्तर बरळला

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला.यानंतर पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान निस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.

भारत-पाक यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता पाकचा माजी गोलंदाज अख्तरने उडी घेतली आहे. तो म्हणाला,”आम्हाला युद्ध नको, असे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख गेले काही दिवस सातत्याने भारताला सांगत आहेत. तसेच अनेकदा चर्चेची मागणी करूनही भारताकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. जर ते आम्हाला आव्हान देत असतील, तर आम्हीही सज्ज आहोत. आम्हीही त्यांना युद्धाच्या मैदानावर बघून घेऊ.”

- Advertisement -

 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.