InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ममता बॅनर्जींनी नाकारली अमित शाहांच्या रॅलीला परवानगी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, आता ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अमित शाह यांच्या रॅलीला दिलेली परवानगी नाकारली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाधवपूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. पण, त्यांच्या रॅलीला देण्यात आलेली परवानगी आता ममता बॅनर्जी सरकारनं रद्द केली आहे. शिवाय, हेलिकॉप्टर उतरवण्यास देखील परवानगी देण्यात आलेली नाही.

आता भाजप निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.