Western Dress | तुळजापूरनंतर पुण्यातील मंदिरात वेस्टर्न कपड्यांना बंदी

Vagheshwar Temple | पुणे : पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल जातं. सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुणे शहरांमध्ये अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळतात. तर आता अशाच एका प्राचीन मंदिराबाबत एक माहिती समोर आली आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिरमध्ये (Vagheshwar Temple) आता ड्रेस कोडचा नियम करण्यात आला आहे. यामुळे चर्चना उधाण आलं आहे. नक्की काय नियम करण्यात आला आहे. का असा निर्णय घेण्यात आला? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

‘या’ मंदिराच्या गाभाऱ्यात वेस्टर्न ड्रेस घालणाऱ्या प्रवेश नाही

वाघोली विकास प्रतिष्ठाणने असा निर्णय घेतला आहे की, वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपडे घालून जाता येणार नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या मंदिरामध्ये शॉर्ट कपडे परिधान करून अनेक जण दर्शनासाठी येतात. वेस्टर्न ड्रेस घालून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे मंदिराचं पावित्र्य भंग होत आहे. म्हणून काही भविकांनी देखील हा प्रकार बंद झाला पाहिजे अशी मंदिर ट्रस्टकडे तक्रार केली यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी मंदिर ट्रस्ट ( Vagheshwar Temple) ने हा निर्णय घेतला आहे.

western dress are not allowed inside the temple

दरम्यान, मंदिर परिसरात( Vagheshwar Temple) देखील ड्रेसकोडचा फलक लावण्यात आला असून त्यावर चित्र दाखवत. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसचं पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात असाच नियम करण्यात आला होता. फलक देखील लावण्यात आला होता. परंतु, काही तासातच मंदिर प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर आता पुण्यातील वाघेश्वर मंदिराने (Vagheshwar Temple) हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45wmpLo