प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी निक जोनसनं हे काय केलं?

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्ये देखील तिची वेगळीच जागा निर्माण केली आहे. प्रियांका सोशल मीडियावर चाहत्यांसोबत अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अलिकडेच प्रियांकाने निक सोबत भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून पुन्हा या दोघांनी आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

प्रियांका आणि निक खूप दिवसांनी एकमेकांना भेटले. त्याचे असे की, प्रियांका तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या सिनेमाच्या चित्रीकरणानिमित्ताने लंडनमध्येच मुक्कीमी आहे. तर निक अमेरिकेतील त्याच्या घरी होता. त्यानंतर निक प्रियंकाला भेटायला लंडनला गेला.

प्रियांकाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये प्रियांका आणि निकने एकमेकांना घट्ट आलिंगन दिले आहे. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की ते कित्येक महिन्यांनी एकमेकांना भेटत आहेत. निकसोबतचा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले, ‘तो घरी आला आहे’ यासोबतच तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला.

अभिनेत्री प्रियांका आणि पती निक जोनसमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. त्यांच्या लग्नानंतर अनेक दिवस हे दोघे सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होताना दिसले होते. मात्र या सर्व गोष्टींचा यांच्या नात्यावर अजिबात फरक पडत नाही. उलट दिवसेंदिवस हे दोघे अधिकचं रोमँटिक होतं आहेत. यातून त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. चाहते मात्र या दोघांच्या जोडीला नेहमीचं पसंत करतात. त्यांच्या प्रत्येक कमेंटला भरभरून दाद देत असतात.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा