शरद पवारांनी सांगली आणि महाराष्ट्रासाठी काय केले?; अमित शहांचा सवाल

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुष्काळी जत येथे आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात कलम ३७०, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भर दिला. त्याचबरोबर राज्यातील फडणवीस सरकारमुळेच सांगलीचा विकास झाल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे पडलेल्या महाराष्ट्राला विकसित राज्य केल्याचे ते म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोलही केला. त्यांचा विशेष रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर होता. पवार यांच्या आघाडीची राज्यात 15 वर्षे सत्ता होती. या 15 वर्षांत त्यांनी काय केले हे कधी सांगितले का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

आघाडीच्या काळात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे टिकू शकला नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्त्व सातत्याने मुख्यमंत्री बदलत राहायचे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सलग पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. या स्थैर्यामुळे राज्याचा विकास झाला. परिणामी देशात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दबदबा वाढू लागला आहे. ‘नरेंद्र-देवेंद्र’ या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.