ती सध्या काय करते? वायरल विडिओ मुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल आता आहेत तरी कुठे

पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेच्या विषय बनल्या होत्या. सुरुवातीला लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी रानू यांना दिली होती. ज्यामुळे त्यांची सगळीकडेच खूप चर्चा झाली मात्र काही दिवसांपासून त्या अचानक कुठे गायब झाल्या आहेत.

रानू मंडल या सध्या सोशल मीडियावर कुठेच दिसत नसल्यानं त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की रानू मंडल या सध्या प्रचंड काम करत आहेत. त्यांचं ऑफिशियल फेसबुक पेज नुकतंच तयार करण्यात आलं असून त्यावरुन त्यांचा कामविषयीचे अपडेट शेअर केले जात आहेत.

Loading...

Biopic Ranu Mondal Team

Biopic Ranu Mondal Team

Ranu Mondal ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2019

याशिवाय रानू यांच्या बायोपिकचं सुद्धा काम सुरू असून त्यामुळे रानू सध्या त्यांच्या कामात बीझी आहेत. दरम्यान आपलं अर्ध्याहून जास्त आयुष्य कष्टात घलवणाऱ्या रानू यांना नुकताच त्यांचा पासपोर्ट मिळाला आहे.

रानू मंडल यांची सध्या कामानिमित्त खूपच धावपळ होत आहे. अद्याप त्या पश्चिम बंगालमधील त्यांच्या घरी राहत आहेत आणि त्यांच्याकडे सध्या बॉलिवूडची काही गाणी सुद्धा आहेत त्यामुळे पश्चिम बंगाल ते मुंबई असा त्यांचा सततचा प्रवास सुरू असतो.  हिमेश रेशमियाचा सिनेमा ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’चं ‘तेरी मेरी कहानी’ हे रानू मंडल यांनी गायलेलं गाणं रिलीज झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं खूप कौतुक झालं होतं.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.