InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘तारे जमीन पर’ मधील ‘तो’ बालकलाकार सध्या काय करतो ?

बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या ‘तारे जमीं पर’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2007 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा एका ईशान नावाच्या लहान मुलाच्या भावविश्वावर होती. मात्र आमिर खान सारखा सुप्रसिद्ध चेहरा असतानाही बालकलाकाराच्या भूमिकेतील दर्शील सफारी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.दर्शीलचे वडील मितेश सफारी यांनीही अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी दूरदर्शन वरील ‘चाणक्य’ या मालिकेत बाल चाणक्याची भूमिका साकारली होती.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्शीलला 2008 मध्ये सर्वात कमी वयात फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला. ‘तारे जमीं पर’ नंतर दर्शीलनं ‘बमबम बोले’, ‘जोकोमोन’, ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ या चित्रपटांमध्ये काम केल्या व्यतिरिक्त दर्शीलनं टीव्ही शो मध्येही काम केलंय. ‘सुन यार ट्राय मार’ आणि कलर्स टिव्हीचा डान्स रिअलिटी शो ‘झलक दिखला जा’ या टीव्ही शोमध्ये दिसला. तसेच तो काही जाहिरातींमध्येही झळकला. दर्शीलनं नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण केलं असून सध्या तो नाटकाचे धडेही घेत आहे. याशिवाय तो नाटकात कामही करतोय. ‘कॅन आय हेल्प यू’ या नाटकात त्याने काम केलं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.