‘टिंब टिंब टिंबचा अर्थ काय होतो? आता काय समजायचं माणसानं’; अजित पवारांची टोलेबाजी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना घेऊन राज्याच्या पर्यटन विभागाने आजचा जागतिक पर्यटन दिन साजरा केला. त्यावरच बोट ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या दलबदलूंचा यावेळी चांगलाच समाचार घेतला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात यावरच बोट ठेवत अजित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना फटकारले. ‘जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेली ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ ही संकल्पना कुठल्याही पक्षाच्या नेत्यांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी नाही’, असे नमूद करत अजित पवार यांनी टोलेबाजी केली.

राजकीय पर्यटन वगळून बाकी सर्व पर्यटनासाठी आपण प्रयत्न करूया. त्यासाठी माध्यमांनी देखील आम्हाला साथ द्यावी. ब्रेकिंग न्यूज सोडून पर्यटनाची माहिती देणार असेल तर त्यांनाही आम्ही क्लिप देऊ. नको त्या क्लिप देणार नाही. चांगल्या क्लिप देऊ. नाहीतर महिला काय बोलली…, आमदार काय बोलला… नुसतंच टिंब टिंब टिंब देयचं असेल तर माणसानं काय समजावं, असं म्हणत अजित पवारांनी चांगलाच कार्यक्रम गाजवला.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा