‘महिलांच्या छोट्या बॅगेत नेमकं काय असतं?; बिग बींच्या प्रश्नावर हेमा मालिनीचे मजेशीर उत्तर

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या पर्वातील पुढच्या भागात ‘शोले’ या चित्रपटातील कलाकार हजेरी लावणार आहेत. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या प्रोमोमध्ये अमिताभ यांनी हेमा मालिनी यांना महिलांबद्दल एक खासगी प्रश्न विचारला. “अनेक महिलांकडे एक छोटी पर्स किंवा बॅग असते. ही बॅग ते घराबाहेर जाताना त्यांच्यासोबत ठेवतात. मात्र त्यात नेमंक काय असते?” असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला.
हेमा मालिनी यावर म्हणाल्या, “महिलांच्या त्या छोट्या बॅगेत एक कंगवा, लिपस्टिक आणि फार कमी पैसे असतात.”

हेमा मालिनीच्या या उत्तरवर बिग बी हे थोडे गोंधळून जातात. मात्र त्यानंतर ते पुन्हा हेमा मालिनींना प्रश्न विचारतात.“पण साधारणत: महिला या घराबाहेर पडण्यापूर्वी मेकअप किंवा साजशृंगार करतात. मग तरीही त्या छोट्या बॅगेत ते या गोष्टी का घेऊन फिरतात?” यावर पुन्हा हेमा मालिनी म्हणाल्या, “मेकअप केल्यानंतर थोडा टचअप करावा लागतो. त्यामुळे या वस्तू महिला घेऊन फिरतात,” असं मजेशीर उत्तर हेमा मालिनी यांनी यावेळी दिल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा