हे काय झालं? रितेश देशमुख अडकला ‘घरवाली बाहरवाली’च्या वादात!

मुंबई : बॉलिवूडमधील फेव्हरेट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसोजा देशमुख यांची जोडी ओळखली जाते. हे दोघेही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संपर्क साधत असतात. यावेळी या जोडीने फक्त दोघांचा नाहीतर दिग्दर्शक फराह खानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

फराह खान सध्या एक नवा कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान जेनेलिया आणि रितेश देखील या शोमध्ये गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी त्यांनी फराह सोबत मस्ती केलेला हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश, जेनेलिया आणि फराह यांनी ‘घरवाली बाहरवाली’ या गाण्यावर डान्स केला आहे. तसेच गाण्याच्या शेवटी व्हिडीओमध्ये फराह आणि जेनेलिया निघून जातात. त्यामुळे रितेश एकटाच राहिलेला दिसतो. असा हा गंमतशीर व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

फराह खानच्या या शोचे ‘झी कॉमेडी नाईटस’ असं नाव आहे. शोमध्ये कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, तेजस्वी प्रकाश, अली असगर, फराह खान, पूनित पाठक हे सगळे दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा