किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं : अजित पवार

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. अशातच ते किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जात होते. त्यावेळी किरीट सोमय्या हे सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापूरला चालले होते. परंतु सोमय्या कोल्हापूरात पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना कराडमध्ये रेल्वेमधून खाली उतरवलं आहे.

तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये रेल्वेतून खाली उतरले होते. यानंतर आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे. किरीट सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं, असं अजित पवार यांनी म्हटलं. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं. कुणाला काही पाहणी करायची असेल तर ती करु द्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत. याच बरोबर सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता, कुणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करु. त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या