असं काय झालं अद्वैत दादरकरला? की चक्क त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटचं केलं बंद

मुंबई : ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम अभिनेता अद्वैत दादरकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. मात्र अद्वैतने आता त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे अद्वैतने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अद्वेतने पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दल सांगितलं.

“सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम डिअॅक्टिव्हेट करत आहे. कदाचित काही काळासाठी… माहित नाही परत कधी येईन. मी ओके आहे. त्यामुळे काय झालं वगैरे विचारायला फोन करू नये,” अशी पोस्ट अद्वैतने लिहिली आहे. मात्र चाहऱ्यांकडून वारंवार हाच प्रश्न विचारला जात आहे की, का अद्वैतने इन्स्टाग्राम बंद केले आहे?

अद्वैतने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर तो आता ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत सोहमची भूमिका साकारतोय. या मालिकेत त्याच्यासोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ आणि उमा पेंढारकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा