गेल्या ६ महिन्यात राज्यातल्या महिला अत्याचारा विरोधात काय केलं? भाजपचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपला विरोधकांनी घेरलं आहे. तर, महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले आहेत. राज्यात काँग्रेसकडून हाथरसच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं होत असताना भाजपनं विरोधकांवर टीका केली आहे.

‘महाराष्ट्रात हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष आंदोलन करतोय तर शिवसेनेने आंदोलन केले आहे, सुप्रिया पवार सुळे यांनीही प्रतिक्रीया व्यक्त केली, योगी आदित्यनाथ  सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय?,’ असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

 

हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी अशा दुर्देवी घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाला समजलेले नाही, असे म्हणायचे का?,’ असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.