विलिनीकरण मान्य झालं नाही तर काय?, अनिल परब म्हणतात…
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केले जावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा करत असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणी कायम ठेवत संप सुरुच ठेवला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे.
यावेळी ते म्हणाले, मी संध्याकाळी पुन्हा आढावा घेईन किती हजर झाले. कर्मचारी, एसटी आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजर होत आहेत. हाय कोर्टाने आम्हाला तस सांगितलं आहे. जे हजर होतील त्यांना संरक्षण दिलं जाईल. जर त्यांना कोणी अडवलं तर कारवाई केली जाईल. मूळ वेतनात आम्ही वाढ दिली आहे. राणे काय म्हणतात या वर सरकार चालत नाही संख्या बळावर चालत.
तसेच आता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने विलनीकरणाऱ्या विरोधात निकाल दिला तर काय? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. अनिल परब यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, याबाबतील वेगवेगळे पर्याय आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती. सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना पगार मिळाला पाहिजे. त्यामुळे आताचे पगार आणि सातव्या वेतन आयोगानुसारचे पगार यासंदर्भातील निर्णय चर्चा करून घेतला जाईल, असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शशिकांत शिंदेंच्या पराभवावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- शिंदेंच्या पराभवावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले,…
- पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज
- “वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”
- शिवेंद्रराजेंनीच मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट