InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय ? विजय शिवतारे यांचा सवाल

सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय आहे. फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का ? असा सवाल जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तुत्व आहे. ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल विचारताना या दोघांनी किमान दहा वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षांनी करायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.