‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’

मुंबई : ‘लखीमपूर खेरी’ येथे उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने 4 शेतकरी चिरडून मारले. “शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालाय.

या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पहाणीसाठी आणि पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी, “प्रियंका गांधी वढेरा यांना हरगावमधून अटक करण्यात आलीय,” असा दावा आपल्या ट्विटमध्ये केलाय.

यावरून शिवसेना खासदार संजय राऊत हे आक्रमक झाले आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच देशासाठी ज्या कुटुंबाचा मोठा त्याग, प्रियांका त्या कुटुंबातून, त्यांचा गुन्हा काय? प्रियांका गांधींशी पोलिसांचं वागणं अत्यंत असभ्य होतं. पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा गुन्हा काय होता ती त्यांना ताब्यात घेतलं गेलं? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा