‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे काय? ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा केला जातो?

यंदा ‘व्हेलेंटाईन वीक’ ला आज ७ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. ७ ते १४ फेब्रुवारी या आठवड्याच्या काळात तरुणाई दर दिवशी एक प्रेमाचा दिवस साजरा करतात. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ ‘व्हॅलेंटाइन डे’चा इतिहास तसेच कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.

प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला.

केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाईन’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता डे

07 फेब्रुवारी : रोझ डे

08 फेब्रुवारी : प्रपोज डे

09 फेब्रुवारी : चॉकलेट डे

10 फेब्रुवारी : टेडी डे

11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे

12 फेब्रुवारी : हग डे

13 फेब्रुवारी : किस डे

14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा