‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे…’; उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवांराची प्रतिक्रिया

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.

तर मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ, असे सूचक विधान करुन मुख्यमंत्र्यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरूवात केली आहे.

भर सभेत केलेल्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांचे भावी सहकारी कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अशातच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी काय बोलावं मी कसं ठरवणार?, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे मी काय सांगू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा