‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार?’, सदाभाऊंचा सवाल

हिंगोली : अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसेच अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. शिवाजी महाराजांबद्दल सर्वांच्याच मनात आदर, प्रेम आणि अभिमानाची भावना आहे. मात्र, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अश्वावर उभं राहून हार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवले यांच्याकडून हि बाब घडल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तसेच, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार, राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवन वर बोलून फुलाचा हार घालणार? असा सवाल सदाभाऊंनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा