दुकानावर पाट्या लावून काय होणार? मराठी शाळा वाचवा; सुमित राघवनचे आवाहन

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा मोठा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक असणारा आहे.

यावरून आता सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयाचं काहींकडून स्वागत होत आहे. मात्र दुसरीकडे या निर्णयावर टीका देखील होत आहेत. तसेच व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता सुमित राघवन याने म्हटले आहे की, दुकानांवरच्या पाट्या मराठीत लिहिल्याने काय होणार? मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, असे आवाहन त्याने केले.

सुमीत राघवनने या निर्णयासंदर्भात पोस्ट केली याने खरंच काही मदत होणार आहे का? तर नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्यासारखा आहे, कृपा करून मोठा विचार करा. दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार? असा सवाल देखील त्याने उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा