नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; शिवसेनेचा खोचक टोला

मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सतत पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद खूप पेटून उठला होता. त्यानंतर आता हे होण्याचं काही दिसेना. यावर्षी देखील कोरोनामुळे गणपती उत्सवावर सरकारने निर्बंध लावले आहेत. यावरून गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारला केला होता.

आता यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. जर गणेश मूर्तींचीं उंची 20 फूटांपेक्षा जास्त असेल तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासते. मात्र, नारायण राणेंना उंचीवरून काय बोलू शकतो?, असा खोचक टोलाही कायंदे यांनी नारायण राणेंना लगावला आहे. केंद्रीय मंत्र्याने गणपतीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध असा प्रश्न करणं म्हणजे बौद्धीक दिवाळखोरीचं लक्षण आहे, असं मनिषा कायंदे यांनी केली आहे.

तसेच ही जागतिक महामारी आहे. या विषयाचं गांभीर्य अनेकांना समजलं आहे. दुर्देवाने काही लोकांना समजलं नाही. केंद्र शासनाने कडक सूचना केलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट कायदा हा देशात लागू आहे. तसेच 144 कलम लावण्याचा अधिकार पोलिसांचा आणि शासनाचा आहे. गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तिसरी लाट आली आहे, असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा