शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचं वातावरण चालू आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. कोदवली ग्रुप ग्रामपंचायतीमधील केळवडे-पाथर्डे येथे माजी खासदार निलेश राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व उमेदवारांशी संवाद साधून कोदवली ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.

भावनिक राजकारण करून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने आपल्याला मागास ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला आडवं करा कारण शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकासाचं पर्व सुरू होणार नाही असे प्रतिपादन राणे यांनी केले.

ज्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पात शिवसेनेला हाताशी धरून दलाली केली ते येथील वकिल जर गावात मस्ती करत असतील तर त्यांची मस्ती देखील या निवडणूकीत त्यांना घरचा रस्ता दाखवून उतरवा असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टिका केली. केवळ खोटे बालणे, पोकळ आश्वासने देणे आणि जनतेची दिशाभुल करणे हाच शिवसेनेचा कार्यक्रम आहे. शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार असा खडा सवाल उपस्थित करून राणे यांनी आपल्याला गावचा विकास करावयाचा असेल तर शिवसेनेला आडवं केले पाहिजे, जर तसे केलात तर विकास आपोआप आपल्या दारात येईल असेही राणे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.