Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

Whatapp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी फेसबुक पोस्टद्वारे या नवीन फिचरची घोषणा केली आहे.

मार्क झुकरबर्गनं यांनी नवीन फिचरची घोषणा करत लिहिले आहे की,”आजपासून तुम्ही एकच व्हाट्सअप अकाउंट चार फोनमध्ये लॉगिन करू शकतात.” व्हाट्सअपच्या या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांचा डिव्हाइस बदलण्याचा त्रास संपणार आहे. मात्र, आजच्या काळात प्रत्येकाला आपली प्रायव्हसी हवी असताना व्हाट्सअपचे हे नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. झुकरबर्गनं यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर वापरकर्त्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Screenshot 2023 04 26 124257 Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या 'त्या' पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

मार्क झुकरबर्गनं यांच्या पोस्टवरील कमेंट्स (Comments on Mark Zuckerberg’s post)

Frank Abuya

That’s very good,no more cheating

Aruna Biswas

What’s app not good anymore,privacy is gone

Jane Njau

Haiya! You want to break marriages

Ranflin Díaz

That’s gonna be a problem for jealous couples

Men’s Conference Zambia 

The way relationships will end faster

Very nice. Now my wife can log into my WhatsApp from her phone.
Genius

Mwene Vunongue 

This can only be the idea of a jealous person. 🤦🏾‍♂️ How come, dear Mark?

喬寶寶 Qbobo

Can all Good morning groups goes to all four phones?

Muansanga Nunsangpa

Thanks. But you will have to provide me the other 3 phones as I have only one phone

Mayur Lankeshwar

इथं एक सांभाळणं होईना भाऊ. चार चार ठिकाणी लॉगिन करून काम धंदा करायचा की नाही आम्ही?

Butik GH

Cheating gon be difficult with this. On behalf of all Ghanaians 🇬🇭, we are not interested

Faria Islam

Great 👍 thats better but a bit risky 😜😜 for some people. Now their wives will keep one account on their phone

 

Amy Gabriella

The divorce rate is going to skyrocket.
This will end some relationships now

It’s Not Possible Sir Stop Please Becouse………

 

MERAAD Sharon

This is great! At least my neighbors wife can have access to her husband’s WhatsApp
दरम्यान, अतुल पाटील मार्कची पोस्ट शेअर करत म्हणाले आहे, “कशाला कशाला…? हा अगाऊपणा कशाला…!” अतुल पाटील यांच्या फेसबुक पोस्टवर अभिजीत हिरप कमेंट करत म्हणाले,”Punam Patil खुशखबर!!! खुशखबर!!! खुशखबर!!!
तुमच्या मोबाईलमध्ये अतुलच व्हॉट्स ॲप सुरू करता येणार आहे.” व्हाट्सअपचे हे नवीन फिचर किती फायदेशीर ठरेल आणि घोळ घालेल, हे बघणे मजेशीर ठरणार आहे.

व्हाट्सअपचे हे नवीन फीचर कसे वापरायचे? (How to use this new feature of WhatsApp?)

मार्क झुकरबर्गनंने जाहीर केलेल्या नवीन फिचरनुसार तुम्ही आता चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. यासाठी तुम्हाला खालील पद्धती फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप सुरू करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला More Options पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • समोर आलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला Link Device हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करून QR कोड स्कॅन करून घ्यावा लागेल.
  • QR कोड स्कॅन झाल्यानंतर तुमचे व्हाट्सअप दुसऱ्या फोनमध्ये सुरू होईल.

व्हाट्सअप अपडेट केल्यानंतर तुम्हाला जर हे फिचर दिसत नसेल, तर तुम्ही व्हाट्सअप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करू शकतात. व्हाट्सअप पुन्हा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हा ऑप्शन दिसेल.

महत्वाच्या बातम्या