Whatapp Down | अर्ध्या तासापासून व्हाट्सअप बंद,तर ट्वीटरवर मीम्सचा पाऊस

टीम महाराष्ट्र देशा: इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप Whatapp चे सर्व्हर डाऊन Server Down झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून अनेक भागांमध्ये व्हाट्सअप सर्व्हर डाऊन झाल्याच्या मोठ्या तक्रारी वापरकर्त्यांकडून केल्या जात आहे. ही समस्या कशामुळे निर्माण झाली आहे याबद्दल अद्यापही कोणती अधिकृत माहिती कंपनीकडून मिळाली नाही. तर दुसरीकडे वापरकर्त्याकडून ट्विटर वर Twitter व्हाट्सअप डाऊन असा हॅशटॅग Hashtag ट्रेंड केल्या जात आहे.

गेल्या अर्धा तासापासून व्हाट्सअप डाऊन झाल्यामुळे लाखो वापरकर्त्याना अनेक समस्या निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीत ही समस्या निर्माण झाल्यामुळे वापर वापरकर्त्याना आता एकमेकांना शुभेच्छा देण्यास व्यत्यय निर्माण होत आहे. व्हाट्सअप मुळे लोकांना एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे अगदी सोपे होऊन गेले होते. पण गेल्या अर्ध्या तासापासून व्हाट्सअप वापरकर्ता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

व्हाट्सअप सुरळीत चालू असताना गेल्या अर्धा तासापूर्वी अचानक व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज जाणे बंद झाले. त्यानंतर काही क्षणातच इन्कमिंग मेसेज सर्विस देखील बंद झाली. व्हाट्सअप सर्व्हर डाऊन झाले. यामुळे वापर करताना मोठी गैरसोय होत असून अनेक कामं ठप्प झाली आहेत.

दरम्यान, व्हाट्सअप चा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडून वापर करताना पुन्हा एकदा व्हाट्सअप ची सुरळीत सुविधा पुरविण्यात येईल असे मेटाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

व्हाट्सअप Whatapp बंद झाल्यामुळे ट्वीटरवर मीम्सचा पाऊस

जगभरात गेल्या अर्ध्या तासापासून व्हाट्सअप सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे व्हाट्सअप वापरकर्ता मोठ्या संकटात सापडलेला आहे. तर दुसरीकडे वापरकर्त्यांकडून ट्विटरवर मीन्सचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर,वापरकर्त्याकडून ट्विटरवर व्हाट्सअप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड केल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.