Whatapp Update | व्हाट्सअपच्या नवीन अपडेटव्दारे 32 लोक एकाच वेळी करू शकतील व्हिडिओ कॉल

टीम महाराष्ट्र देशा: या वर्षाच्या सुरुवातीलाच मेटा (Meta) सीईओ मार्क झुकरबर्ग (CEO Mark Zuckerberg) ने घोषणा केली होती की, यावर्षी व्हाट्सअप (Whatapp) मध्ये नवनवीन बदल होणार आहेत जे लोकांच्या अधिक फायद्याचे असतील. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल (Video Call) च्या नवीन वैशिष्ट्याबद्दल सांगितले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन अपडेटमध्ये ग्रुप व्हिडिओ कॉल मध्ये महत्वाचे अपडेट येणार होते. हे व्हाट्सअप ग्रुप संबंधित नवीन अपडेट आलेले असून आता व्हाट्सअप ग्रुप मध्ये 1024 वापरकर्ते जोडता येऊ शकतात तर त्याचबरोबर एकाच वेळी 32 लोकांना व्हिडिओ कॉल केला जाऊ शकतो.

व्हाट्सअप नवीन अपडेट (Whatapp New Update)

व्हाट्सअपमध्ये आज नवीन अपडेट आले आहे. या नवीन अपडेटनुसार, आज पासून व्हाट्सअप ग्रुप मध्ये 1024 पर्यंत मेंबर जोडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत तुम्ही एका ग्रुपमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांना जोडू शकत नव्हता पण आता नवीन आलेले अपडेट नुसार तुम्ही 1024 पर्यंत मेंबर जोडता येईल. त्याचबरोबर आता तुम्ही एकाच वेळी 32 लोकांना जोडून व्हिडिओ कॉल करू शकता.

इन-चॅट पोल फीचर

व्हाट्सअपने व्हाट्सअप इन-चॅट पोल फीचरची आधीच चाचणी सुरू केली होती. व्हाट्सअप इन-चॅट पोल या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअप वर एक प्रश्न तयार करू शकता. त्या प्रश्नासाठी ॲप मध्ये एका स्वतंत्र स्क्रीन मध्ये 12 पर्यंत त्या प्रश्नाची संभाव्य उत्तरे जोडण्याची परवानगी देऊ शकता. हे फीचर कसे दिसेल याबद्दल व्हाट्सअप ने अद्यापही कोणता खुलासा केलेला नाही. हे नवीन फीचर मिळवण्यासाठी तुम्हाला Whatapp Play Store किंवा App Store ला जाऊन तुमचे व्हाट्सअप अपडेट करावे लागेल.

व्हाट्सअप चे इतर नवीन अपडेट

इन-चॅट पोल, व्हाट्सअप ग्रुप आणि त्याचबरोबर व्हाट्सअप व्हिडिओ कॉलच्या अपडेट्ससह व्हाट्सअप अजून अनेक मोठे अपडेट आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. या अपडेट मध्ये तुम्ही मोठी फाईल शेअर करू शकतात. त्याचबरोबर इमोजी रिएक्शन आणि एडमिन डिलीट पिक्चर देखील व्हाट्सअप ने आपल्या वापरकर्त्यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.