WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! व्हाट्सॲपनं लॉन्च केलं चॅट लॉक फीचर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हाट्सॲपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यासाठी नवनवीन फीचर लाँच करत असतो. काही दिवसांपूर्वी व्हाट्सॲपनं एडिट मेसेज फीचर लॉन्च केलं होतं. त्यानंतर व्हाट्सॲपनं आता चॅट लॉक (Chat lock) फीचर लॉन्च केलं आहे.

व्हाट्सॲपनं (WhatsApp) चॅट लॉक फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे खाजगी मेसेज लॉक करू शकतात. जवळपास सर्वच व्हाट्सॲप वापरकर्त्यांना या फीचरचा लाभ घेता येणार आहे. खाजगी चॅट लॉक केल्यानंतर तुम्हाला ते फिंगरप्रिंट वापरून ओपन करता येईल.

How to lock WhatsApp chat?

  • सर्वप्रथम तुम्हाला व्हाट्सॲपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करून घ्यावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला व्हाट्सॲपची जी चॅट लॉक करायची असेल, ती ओपन करावी लागेल.
  • चॅट ओपन केल्यानंतर त्याच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला डिसअपीयरिंग मेसेजच्या खाली चॅट लॉक हे फीचर दिसेल.
  • मेसेज लॉक करण्यासाठी तुम्हाला चॅट लॉक पर्यायावर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर फिंगरप्रिंटच्या मदतीने तुम्ही तुमची चॅट लॉक करू शकतात.

दरम्यान, लॉक (WhatsApp) केलेली चॅट पुन्हा उघडताना तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ शकतात. फिंगरप्रिंटचा वापर करून तुम्ही चॅट अनलॉक करू शकतात. मात्र, चॅट अनलॉक होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/whatsapp-has-launched-chat-lock-feature/?feed_id=45467