InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी काही टीपा

- Advertisement -

 1. फॉरवर्ड केलेला संदेश कोणता ते समजून घ्या

  तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हेे “फॉरवर्ड केले” या लेबल मुळे समजण्यास मदत होते. मूळ संदेश कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तथ्‍ये दोनदा तपासून पहा. फॉरवर्ड केलेल्या संदेशांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फॉरवर्ड संदेशांवरील.

 2. फोटो आणि मीडिया काळजीपूर्वक तपासा

  तुम्हाला चुकीची माहिती कळावी यासाठी फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यामध्ये फेरफार केलेली असू शकते. ही बातमी इतर विश्वासार्ह प्रसारमाध्यमांकडे देखील रिपोर्ट केली गेली आहे का ते पहा. ही बातमी अनेक ठिकाणी प्रसारित होत असल्यास, ती सत्य असण्‍याची शक्यता अधिक असते.

 3. विचित्र दिसणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा

  फसवणुकीच्या किंवा खोट्या बातम्या असलेल्‍या अनेक संदेशांमध्‍ये शब्दलेखनाच्या चुका असतात. या संकेतांकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे माहिती अचूक आहे किंवा नाही ते तुम्ही तपासू शकता. संशयास्पद लिंक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशयास्पद लिंक वरील .

 4. तुमची मते पुन्हा एकदा तपासून पहा

  तुमच्या पूर्वग्रहांना मान्यता दर्शविणारी माहिती असेल तर त्याकडे बारकाईने बघा आणि ती माहिती शेअर करण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्या. अशक्य आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्या शक्यतो खोट्याच असतात.

 5. खोट्या बातम्या सहसा व्हायरल होतात

  केवळ अनेक वेळा संदेश शेअर केल्याने, तो सत्य होत नाही. केवळ पाठविणाऱ्याने तुम्हाला कळकळीची विनंती केली आहे म्हणून तो संदेश फॉरवर्ड करू नका.

 6. इतर माध्यमांद्वारे त्याची सत्त्यता पडताळून बघा

  तुम्हाला अजूनही खात्री नसेल की आलेला संदेश खरा आहे की खोटा, तर ऑनलाईन जा आणि विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पहा. तुम्ही अजूनही साशंक असाल तर याविषयी ज्या व्यक्तींना खरोखर माहिती असेल अशा व्यक्तींना विचारा.

 7. प्रसार थांबविण्यासाठी मदत करा

  तुम्हाला जर खोटी माहिती फॉरवर्ड होऊन आली असेल तर ज्यांनी तुम्हाला ती पाठविली त्यांना संदेश पाठविण्याअगोदर त्यामधील माहिती तपासत जा असे सांगा. तुम्हाला एखाद्याने संदेश पाठविण्यास सांगितले म्हणून तो उगीचच शेअर करू नका. जर एखादा गट किंवा संपर्क सतत खोट्या बातम्या पाठवत असेल तर त्यांची तक्रार नोंदवा. संपर्क किंवा गटाची तक्रार कशी नोंदवायची याविषयी अधिक माहिती हवी असल्यास

महत्त्वाचे : जर तुमच्या असे लक्षात आले की एखादी व्यक्ती भावनिक किंवा शारीरिक अत्याचारास बळी पडत आहे तर कृपया नजीकच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकारी याविषयी मदत करण्यासाठी तत्पर असतात.

Source – WhatApp Team

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.