InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

व्हॉट्सअॅपमध्ये दोन नवे जबरदस्त फीचर्स

मुंबई : जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये GIF सपोर्ट सुरु केलं होतं. आता व्हॉट्सअॅपने GIF शी संबंधित एक नवं फीचर आणलं आहे. अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता GIF चे पर्यायही दिले जातील, जे तुम्ही सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत नव्या अपडेटमध्ये फोटो पाठवण्याची मर्यादा 10 वरुन 30 करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना नवं फीचर मिळणार आहे. लवकर ऑफिशियल व्हॉट्सअॅप यूझर्सनाही अॅप अपडेटनंतर या फीचरचा अनुभव घेता येणार आहे.

GIF इमेज सर्च करण्याचा पर्याय यूझर्सना इमोजीच्या पर्यायावर क्लिक केल्यावर मिळेल. या फीचरच्या मदतीने यूझर्स आपल्या आवडीनुसार वेगवेगळे GIF चॅटिंगदरम्यान वापरु शकतात.

व्हॉट्सअॅपवरुन इमेज शेअर करताना याआधी एकावेळी केवळ 10 इमेज शेअर करण्याची सुविधा होती. मात्र, आता 10 ऐवजी 30 इमेज शेअर करणं शक्य होणार आहे.

आता नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप यूझर्सना दोन्ही नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. सध्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जन वापरणाऱ्यांनाच नव्या फीचरची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.