कृषी मंत्री असताना पवारांनी शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात, पण…

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. शेतकरी आंदोलनाबाबत इतक्या दिवसांपासून शांत बसलेला सचिन रिहाना व ग्रेटाच्या ट्विटनंतर जागा झाल्याने नेटकरी चांगलेच भडकलेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला मोलाचा सल्ला दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार म्हणाले, ”लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील’ असं म्हंटल आहे .

यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. “कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही,” असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा