“राष्ट्रवादीमध्ये आल्यावर भाजपमधील गद्दार कोण हे समजलं, टरबूज सर्च करा मग कळेल”

मुंबई : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाद अखंड महाराष्ट्राने पहिला आहे. भाजपातील अंतर्गत वादावरून एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गिरीश महाजन यांनी शनिवारी खडसे यांच्यावर टीका केल्यानंतर आज जिल्ह्यातील एका कार्यक्रमात खडसे यांनी महाजन यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज सर्च करा मग कळेल गद्दार कोण?, असं म्हणत नाथाभाऊंनी फडणवीसांचां नाव न घेता फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा