“मला सकाळी जाग आली तेव्हा…”; नुसरतने सांगितला धक्कादायक किस्सा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या ‘छोरी’ या भयपटामुळे चर्चेत आहे. ती तिच्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान नुकतंच नुसरतने दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यात घडलेल्या भूतांसंबंधित अनुभव शेअर केले आहेत.

नुसरत भरुचाला “तुझा भूत, प्रेत आणि आत्मा यावर विश्वास आहे का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “हो माझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे. ज्या गोष्टी मी पाहू किंवा अनुभवू शकत नाही, अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. मला असे वाटते की या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आपण फक्त या गोष्टींचा विचार करतो की हे कसे होऊ शकते. विशेष म्हणजे माझा एलियन्सवरही विश्वास आहे. ते देखील या जगात कुठेतरी आहेत.”

पुढे नुसरत म्हणाली, “मी लहानपणापासून भूतांवर विश्वास ठेवत असली तरी आतापर्यंत कधीच माझ्यासोबत असे काही घडले नव्हते. मात्र एकदा शूटिंगच्या संदर्भात मी दिल्लीला गेले होते. त्यावेळी मी ज्या हॉटेलमध्ये राहत होती तिथे मला अशाप्रकारे काहीतरी असल्याचे जाणवलं. त्या हॉटेलच्या खोलीत एक लहान कपाट होते. या कपाटात कपडे ठेवण्याइतकी जागा होती. त्याच्या शेजारी एक टेबल देखील होते, जिथे मी माझी सुटकेस बॅग ठेवली होती. रात्रभर ती बॅग उघडी होती.” असे तिने म्हटले.

“पण जेव्हा मी सकाळी उठून पाहिले की माझी सुटकेस खाली पडली होती. माझे सर्व कपडे विखुरलेल्या अवस्थेत होते. मी रात्री झोपताना माझी बॅग टेबलावर ठेवली होती हे मला चांगले आठवते. पण मग सकाळी ती अशाप्रकारे खाली पडलेली आढळल्यामुळे मला फार विचित्र वाटले. यानंतर मी अवघ्या ३० सेकंदात हॉटेलच्या बाहेर आली. यानंतर मी सर्वांना सांगितले की आपल्याला हॉटेलचा रुम लगेचच सोडायला हवा. त्यानंतर आम्ही ते हॉटेल मधून चेकआऊट केले,” असा भयानक किस्सा यावेळी नुसरतने सांगितला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा