“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.’

तसेच, चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल’, अशी खरमरीत टीका जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांनी आपण कायमच शरद पवारांचा आदर करत आलो आहोत, असं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा