InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

हे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा शरद पवार कावळे होते का ?

- Advertisement -

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, असे विधान केले होते. यावरून भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी टीका केली आहे . जेव्हा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? अशी जहरी टीका काकडे यांनी पवारांवर केली आहे .

आपल्या पक्षाच्या हितासाठी वीस वर्षे बरोबर राहिलेली माणसं आता पक्ष सोडून का? जातायत हे त्यांनी तपासून पहावे. शरद पवार यांच्यासारखा जेष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे खरं तर अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असलेले विजयसिंह मोहिते पाटील, पिचड, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीला रामराम करून भारतीय जनता पक्षात का आले यावर पवारांनी आत्मचिंतन करावे.

- Advertisement -

तसेच राष्ट्रवादीतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या नेत्यांना भाजप पक्षात कधीच प्रवेश देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याचेही काकडे म्हणाले .मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. ”कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी.असे शरद पवार म्हणाले होते .

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.