‘शरद पवार जेव्हा संसदेत होते, तेव्हा तुम्ही चड्डी आणि टोपीत होते’, मिटकरींनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.’

तसेच, चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानावरुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका शायरीद्वारे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीतून पाटील यांना प्रत्युत्तर दिलेय. ‘तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’ असा शेर त्यांनी म्हटला आहे. तसेच ‘शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, अशी टीकाही मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केली.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा