शरद पवारांची सुरक्षा काढताच मोदी सरकारवर तुटून पडले ‘हे’ मोठे नेते

दिल्लीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराची सुरक्षा केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी हटवली आहे.सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

खळबळजनक : जातीत घेण्यास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्त्या

‘ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध,’ असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘मा.शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्रचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम,आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांचं सुरक्षाकवच आहे. सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं भाजप किती खोट्या मनोवृत्तीचे आहेत ते,’ अशा शब्दात टीका केली आहे.

Loading...

‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजप आता सूडबुद्धीने वागत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे,’ या भाषेत जयंत पाटील यांनी हल्लबोल केला आहे.

भाजपने केलेल्या ‘त्या’ चुका टाळा, पवारांनी मंत्र्यांना दिल्या सूचना

संजय राऊत म्हणतात’ कि .’शरद पवार एक मोठे नेते आहे याआधी सुद्धा शरद पवार यांच्यावर हल्ला झाला होता. एका माथेफिरूने तो केला होता. त्यातच अशी सुरक्षा काढून टाकून काय साध्य करायला पाहिजे हे दिल्लीत बसलेल्या त्यांच्या गुरुवर्यना कळायला हवं. आता राज्यात सरकार स्थापना करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यामागे काय कुटनीती आहे हे बघावं लागेल,’

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.