‘राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यावर स्वपक्षातील लोकच त्यांचे पंख छाटून टाकतात’ : मंदा म्हात्रे

जालना : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून बोलणाऱ्या भाजपच्या महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षावरच खळबळजनक आरोप केले असल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजपमध्ये महिलांना सन्मान मिळत नसल्याचं मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

जालन्यामध्ये एका कार्यक्रमात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी भाजपावर आरोप केले आहेत. ‘महिलांच्या आयुष्यात मोठा संघर्ष आहे, मी पहिल्या वेळी निवडून आल्यावर सर्व मला बोलले की मोदींच्या लाटेत निवडून आली. आता मी दुसऱ्यांदाही निवडून आले, आता मोदींची लाट नव्हती ना?, मी माझ्या कामामुळे, कतृत्त्वावर आले मात्र महिलांंनी केलेलं काम झाकून टाकायचं,’ असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी आपली खंत बोलून दाखवली.

पुढे बोलताना ‘मी कोणाला घाबरत नाही आणि नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा देऊ नका मी लढणार म्हणजे लढणार’. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यावर स्वपक्षातील लोकच त्यांचे पंख छाटून टाकण्याचं काम करत असल्याचंही मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा