कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचे आदर्श? नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने हटवला आहे.

शिवरायांचा हा पुतळा आमदार रवी राणा यांनी विना परवानगी बसविला होता. अमरावती महानगरपालिकेने केलेल्या दाव्यानुसार हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आला होता. त्यामुळे यावर कारवाई करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळणार असल्याचे चित्र आहे. तसेच सध्या अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

त्यानंतर आता नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. महाराजांचा जो पुतळा हटवला गेला त्यासाठी तीन वर्षांपासून परवानगी मागत होते. त्यानंतर शिवभक्तांनी तो पुतळा स्थापन केला. तो पुतळा या ठाकरे सरकारने हटवला आहे.

शिवाजी महाराजांवर बोललेले बाळासाहेब ठाकरेंना सहन व्हायचे नाही. त्याच महाराष्ट्रात आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी मिळत नाही. आज महाराष्ट्र अशा परिस्थितीत उभा आहे की, लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावे लागत आहे. कुठे गेले आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार? कुठे गेले त्यांचे आदर्श? असा संतप्त सवाल राणा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा