‘पूरग्रस्तांना मदत करायच्या वेळेस कोठे गेले ते सलमान आणि शाहरुख?’: दिपाली सय्यद

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक नागरिकांनी आपला प्राण जीव गमावला होता. यामुळे मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही मदत जाहीर केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दिपाली यांनी बॉलीवूडवर निशाणा साधला होता.

दिपाली सय्यद चिपळूणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘मराठी चित्रपटांपेक्षा आपण हिंदी चित्रपटांना झुकतं माप देतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा ते मदतीला येतात का?, कुठे आहेत सलमान आणि शाहरूख?’, असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला आहे.

“आपण जर मराठी चित्रपटसृष्टीला ताकद दिली तरच मराठी कलाकार पुढे येतील. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही, मराठी चित्रपटांना पाठबळ देत नाही. त्यांनी मदत करण्यासाठी बाहेर पडावं अशी अपेक्षा असेल तर लोकांनीही पाठबळ द्यायला हवं”, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी याआधी पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. त्यावेळी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा