“महाराष्ट्र सरकारची मती कुठे गेली? ड्रगमाफिया तुमचे घरजावई आहेत का?”

मुंबई : सध्या देशात आर्यन खान प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. एनसीबीने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात बॉलिवूड किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते.

मलिक म्हणाले कि, आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही. तर भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय?, असा सवाल मलिक यांनी विचारला होता.

यावर आता भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.एनसीबीच्या अधिकाऱ्याने मोठ्या साहसाने कारवाई करत ड्रग्जसहीत काही लोकांना रंगेहात पकडलं आहे. देशभरातून त्यांचं कौतूक होत असताना राज्य सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही कारवाई ढोंग होत असल्याचं सांगत संबंधित अधिकाऱ्यांचा अपमान करत आहे. असं कदम म्हणाले.

तसेच, पुढे जे अधिकारी कारवाई करतात ते ढोंगी आणि जे ड्रगमाफिया आहेत ते चांगले. काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? महाराष्ट्र सरकारची मती कुठे गेली आहे? ड्रगमाफिया या तिन्ही पक्षांचे कोण लागतात? हे तुमचे घरजावई आहेत का?असा सवालही करत राम कदम यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा