“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. आता रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

“ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही,” अशी देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही,” अशी टीका करत रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर आणि भाजप नेत्यांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा