भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आजच्या सामनामधून उपमुख्यंमत्री अजित पवार यांची बाजू घेताना पहायला मिळाले आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी अजित पवारांना उद्देशून भाष्य केले. संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी मार्गदर्शक मेळावा घेतला. यावेळी बोलताना राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पालकमंत्री आपले नाहीत परंतु राज्यात आपली सत्ता आहे. इथं आपलं कोणीच ऐकत नाही, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री देखील आपलेच आहेत. अजित पवारांना सांगू आमचं ऐका. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला असे विधान करताच एकच हशा पेटला.

तसेच पुढे हे तर असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे राऊत यांचं राष्ट्रवादीला हे थेट आव्हानच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याच मुद्यावरुन भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर घणाघात केला आहे. संजय राऊत हे पार गोंधळून गेले आहेत. त्यांची वक्तव्य ही भरकटलेली आहेत.

यामुळेच तर त्यांनी राष्ट्रवादीने साथ न दिल्यास भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. राऊतांना नेमकं काय करायचं आहे. हेच समजत नाही. तसेच शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीबद्दल संतापाचं वातावरण आहे. ते आज पुण्यात संजय राऊतांनी केलेल्या भाषणामध्ये दिसून आलं. राष्ट्रवादीबद्दल असलेल्या संतापामुळे तर राऊत असं बोलले, असं देखील दरेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा