InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राहुल गांधी जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात : मुख्यमंत्री

- Advertisement -

मी अशोक चव्हाण यांना विनंती करतो, की भोकरमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा ठेवा, कारण राहुल गांधी ज्या ज्या मतदारसंघात जातात, तिथे ते काँग्रेसची मतं कमी केल्याशिवाय राहत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावले.

नांदेडमधील भोकर मतदारसंघात भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोर्ठेकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली ‘एकीकडे राहुल गांधी यांच्यासारखं नेतृत्व काँग्रेसला लाभलेलं आहे. माझी तर खूप इच्छा आहे, या भोकर मतदारसंघामध्ये राहुल गांधींची सभा झालीच पाहिजे. मी तर भोकरचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना विनंती करेन की भोकरमध्ये राहुल गांधींना आणा. कारण राहुल गांधी ज्या ज्या मतदारसंघात जातात, तिथे ते काँग्रेसची मतं कमी केल्याशिवाय राहत नाहीत’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Loading...

- Advertisement -

‘या ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येणार. अशोक रावांना तुम्ही लोकसभेतच घरी बसवलंत. मला असं वाटलं होतं की अशोकराव पुढच्या लोकसभा निवडणुकांची तयारी करायला लागले असतील. पण त्यांना राहावलेलं दिसत नाही. कारण ते पुन्हा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. मला विश्वास आहे, लोकसभेला तुम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवलात.  आता विधानसभेलाही तुम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही’ असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी  व्यक्त केला.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.